breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ३१ हजार ७१९ वर

मुंबई – महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात १० हजार ७३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह राज्यात आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार ६०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ४ लाख ३१ हजार ७१९ इतकी झाली आहे. तसेच काल ३२२ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींचा आकडा १५ हजार ३१६ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर सध्या १ लाख ४९ हजार २१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ६१.८२% तर मृत्यूदर ३.५५% इतका आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात १ हजार ५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार ३४६ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार ३९५ इतका झाला आहे. तसेच शनिवारी मुंबईत ८३२ जणांनी कोरोनावर मात केली, त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील ८७ हजार ९०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे शहरात शनिवारी दिवसभरात नव्याने १ हजार ५०६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ५५ हजार ७६१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने येथील कोरोनाबळींचा आकडा १ हजार ३३५ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी ९०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १८ जणांचा मृत्यू झाला. यासह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता २२ हजार ६३ वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button