breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! मुलीला वाचवताना वडिलांचा विजेचा धक्का बसून मृत्यू

मुलीला विजेचा धक्का बसत असल्याचे  लक्षात आल्याने मुलीच्या वडिलांनी जिवाच्या आकांताने मुलीला दूर लोटले परंतु, या वेळी ते पाय घसरून पडले व गोठय़ातील खांबाला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आहे. या घटनेत मुलीच्या वडिलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मुलगी मात्र बचावली. ही घटना संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

अशोक अद्रेस सोनवणे (वय ३८) मृताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी शेडगाव परिसरात झिमझिम पाऊस सुरू होता. या वेळी अशोक सोनवणे यांची मुलगी घराशेजारी असलेल्या गोठय़ालगत उभी असताना मोठय़ाने ओरडली. त्यामुळे सोनवणे हे बाहेर गेले व मुलीला विजेचा धक्का बसत असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्यांनी जिवाच्या आकांताने मुलीला दूर लोटले परंतु, या वेळी पाय घसरून पडले व गोठय़ातील खांबाला त्याचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. सोनवणे यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते. अशोक सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, आई व तीन भाऊ असा मोठा परिवार असून त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मयत सोनवणे याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button