breaking-news

धक्कादायक! भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडले

औरंगाबाद | महाईन्यूज

वैजापूर – औरंगाबाद महामार्गावर असलेल्या शिऊर बंगला नजीक असलेल्या शुभम जिनिंगजवळ भरधाव टेम्पोने सख्या भावांना चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे. सागर इसराम लोहारे (१३) व नवीन इसराम लोहारे ( ०८) असे मृतांची नावे असून ते मुळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश येथील मोहरदड ( ता.शेंदवा, जि बडवणी ) येथील इसराम लोहारे हे १५ दिवसांपूर्वी येथील शुभम जिनिंगमध्ये काम करण्यासाठी आले आहेत. ते पत्नी, दोन मुली आणि सागर व नवीन या दोन मुलांसोबत बालाजी जिनिंग परिसरात पालात राहत आहेत. आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान सागर आणि नवीन आपल्या झोपडीतून वडील काम करत असलेल्या शुभम जिनिंगकडे चालत येते होते. जिनिंगजवळ असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने चिरडले आहे. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. टेम्पो चालकाने घटनास्थळापासून पळ काढला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button