breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक! बिहारमध्ये महिलेला मारहाणीनंतर केलं निर्वस्त्र

पाटणा- भोजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोजपूरच्या बिहियामध्ये एका तरुणाच्या हत्या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून जमावानं महिलेला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे त्या महिलेला मारहाण केल्यानंतर निर्वस्त्र करून फिरवलं आहे. स्थानिक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून, पाटण्याचे आयजी नय्यर हसनैन खाँ यांनी कारवाई करत बिहिया एसएचओसह 8 पोलिसांना निलंबित केलं आहे. जिल्ह्यातील एसपींनी सर्व दोषींच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

बिहिया पोलीस ठाण्याच्या इन्चार्जवर विभागीय कारवाई केली जाणार आहे. ही घटना 20 ऑगस्ट रोजी बिहिया रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. रेल्वे स्टेशनजवळ 19 वर्षांच्या विमलेश कुमार नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला, विमलेश याची हत्या करण्यात आल्याचीही काहींना शंका आहे. विमलेशच्या कुटुंबीयांनी जवळच राहणा-या महिलेवर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं गावक-यांनी अनेक दुकानांमध्ये जाळपोळ केली. तसेच महिलांचं घरही पेटवून दिलं. त्यानंतर जमावानं महिलेला घराबाहेर खेचून तिची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर तिला निर्वस्त्र करण्यात आले.

जमावानं ट्रेनवरही दगडफेक केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केलं आहे. जमावात सहभागी असलेल्या लोकांवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button