breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबादेत आज 35 रुग्णांची वाढ, रुग्ण संख्या 1400 पार

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रोज नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहे. आजही 35 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1397 वर गेली आहे. तर यामधील 62 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे यामधील 831 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी (4), रेल्वे स्टेशन परिसर (2), सिटी चौक (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), साई नगर एन सहा (1), संभाजी कॉलनी, एन सहा (2), करीम कॉलनी रोशन गेट (1) अंगुरी बाग (1), तानाजी चौक, बालाजी नगर (1), एन अकरा हडको (1), जय भवानी नगर (2), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 14 महिला आणि 11 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button