breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

धक्कादायक! पहिल्या पतीचे नातेवाईक जीवावर उठले, घरात घुसून चाकूने वार करून महिलेचा खून

जालना: संपत्तीच्या वादातून पहिल्या नवऱ्याच्या कुटुंबीयांनी एका विवाहितेला बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काजीपुरा परिसरात घडलेली आहे. हिना सय्यद माजेद (30)असं या मयत विवाहितेचं नाव आहे. हिनाचे दुसरे लग्न झालेले असून संपत्तीच्या वादातून रविवारी रात्री पहिल्या पतीसोबत वाद झालेला होता.

या वादातून अरबाज खान जफर खान, शाहबाज जफर खान, शेख अजगर शेख अब्दूल वहाब, अकबर धूम अली शाह, इस्माईल शाह व अन्य सहा महिलांनी फिर्यादी सय्यद माजिद सय्यद कय्यूम यांच्या काझीपुरा येथील घरात घुसून त्यांना व त्यांची पत्नी हिना यांना लोखंडी रॉड, काठी आणि चाकूने वार करुन जबर मारहाण केलेली आहे. यात हिना सय्यद माजिद (30) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती फिर्यादी सय्यद माजिद हे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button