breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! परीक्षेला बसलेले 3 विद्यार्थी निघाले पॉझिटिव्ह, 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

केरळ – देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे अजूनही काही विद्यापीठं मुलांच्या परीक्षा घेत आहेत. मेडिकल, अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहेत. अशीच एक प्रवेश परीक्षा केरळमधील इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकलने (KEAM) आयोजित केली होती. मात्र या परीक्षेदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम मोडण्यात आले. परिणामी परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक असे एकूण 6 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी तब्बल 600 पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी या परीक्षेला बसलेले दोन विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आले होते, त्यानंतर आणखी एक विद्यार्थी आणि उपस्थित पालकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकारानंतर केरळ सरकारने KEAMवर कारवाई करण्याचे ठरवल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर पालकांनी केलेल्या गर्दीचा फोटो व्हायरल झाला. या फोटोवरून या परीक्षेस उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या 600 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही परीक्षा 16 जुलै रोजी घेण्यात आली होती. दरम्यान परीक्षा केंद्राबाहेर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवण्यात आल्याचे दिसून आले. व्हायरल झालेल्या फोटोवरून पालकांविरुद्ध कलम 269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलीस सध्या या प्रकरणातील व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ तपासून लोकांची ओळख पटवत आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या केरळ सरकारने परीक्षेला परवानगी दिलीच कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातही अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून वादंग सुरू आहे. एकीकडे सरकार परीक्षा रद्द करण्याच्या तयारीत आहे मात्र विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) परीक्षा घेण्याची सक्ती करत आहे. त्यामुळे केरळमधील हे प्रकरणं समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button