breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! तारापूरमधील प्रदूषणकारी तीन कारखाने बंद

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना त्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.  बजाज हेल्थ केअर कंपनीच्या या कंपन्या असून प्रक्रिया अपूर्ण असतानाही  त्या हस्तांतरित केल्याचे उघड झाले होते. त्याचप्रमाणे परवानगी नसलेले उत्पादन, बनावट कागदपत्रांद्वारे कंपन्यांचे हस्तांतरण,  मोठय़ा प्रमाणात घनकचऱ्याची साठवणूक करणे, नाल्यात रसायन सोडणे आदी प्रकार निदर्शनास आले होते. त्यामुळे  ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळाच्या ई—६२/६३ या वेट फार्मा लिमिटेड नावाने उत्पादनाची परवानगी असलेल्या कारखान्यांवर बजाज हेल्थ केअर लिमिटेड अशा नावाने नामफलक झळकला होता.  प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे या प्लॉटचे हस्तांतर करण्यासाठी आवश्यक कागदपत्र देण्यात आली नव्हती. प्लॉटमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत असून या कंपनीमध्ये असलेल्या टाक्यांमध्ये औद्योगिक सांडपाणी साठवणूक केल्याचे तसेच परवानगी नसताना उत्पादन घेत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबरीने पर्यावरण विभागाचे मान्यता प्राप्त नसताना क्लोरिनेशन ब्रोमिनेशन या दोन घातक प्रक्रिया सुरू असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे.

एल-११ या प्लॉटमध्ये कार्यरत  न्यूट्रा प्लस इंडिया लिमिटेड या कारखान्यांच्या आवारामध्ये दुसऱ्या कारखान्याचा सुमारे दीडशे मेट्रिक टन घातक घनकचरा अयोग्य पद्धतीने साठवणूक केला जात असे. या संदर्भात उद्योगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला बनावट  कागदपत्र दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  २०  मे रोजी घडलेल्या एका घटनेत बोईसर पोलिसांनी घातक घनकचरा वाहतूक करणारी वाहने कागदपत्रे खोटी असतानाही सोडून दिल्याचा प्रकार घडला होता, असे म्हटले जात आहे.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर  कारखान्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ४० टन घातक घनकचरा व १२० ड्रम घातक रसायन साठवणूक केल्याचे उघड झाले.

औद्योगिक क्षेत्रातील नाल्यात व रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत बेकायदा रसायन सोडल्या प्रकरणी संबंधित कारखान्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. 

-राजेंद्र तोतरा, उपअभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button