breaking-newsराष्ट्रिय

पेट्रोल, डिझेलच्या भावात विक्रमी वाढ

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या भावाने आज विक्रमी पातळी गाठली. पेट्रोलच्या भावात आज दिल्लीत 33 पैसे तर डिझेलच्या भावात 26 पैसे इतकी वाढ झाली. ही भाववाढ सर्व देशभर लागू झाली असली तरी त्याचे नेमके दर मात्र त्यात्या राज्यातील व्हॅट आणि अन्य करांनुसार बदलले आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत दिल्लीत मात्र अन्य महानगरांच्या तुलनेत स्वत दरात इंधन उपलब्ध आहे. कारण दिल्ली सरकारचे इंधनावरचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत कमी आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी 14 मे पासून सलग सातव्या दिवशी इंधनातील वाढ जाहीर केली. मुंबईत आज पेट्रोलचा दर 84 रूपये 7 पैसे इतका झाला तर डिझेलचा दर 71 रूपये 94 पैसे इतका झाला आहे. इंधनदरांचा हा वाढता बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादनशुल्क कमी करावे अशी मागणी जनतेकडून होत आहे पण केंद्र सरकारच्या आर्थिक विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी त्याविषयी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button