breaking-newsराष्ट्रिय

उत्तर प्रदेशात “आयएसआय’च्या संशयिताला अटक

  • इस्लामाबादेत भारतीय अधिकाऱ्याच्या घरी हेरगिरी केल्याचा संशय

  • कर्जबाजारीपणामुळे “आयएसआय’ला महत्वाची माहिती विकली

लखनौ/पिथोरगड – उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने “आयएसआय’च्या संशयित एजंटला अटक केली आहे. हा संशयित पाकिस्तानमध्ये 2015- 17 दरम्यान भारतीय अधिकाऱ्याच्या घरी आचाऱ्याचे काम करत होता. उत्तराखंडातील पिथोरगड जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. रमेश सिंह कान्याल असे त्याचे नाव आहे, असे लखनौ आणि पिथोरगडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कान्याल याला उत्तराखंड पोलिस आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या संयुक्‍त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. त्याने भारतीय अधिकाऱ्याच्या घरी चोरी केल्याचा संशय आहे. त्याला चौकशीसाठी लखनौला नेण्यात आले असल्याचे पिथोरगडचे पोलिस अधिक्षक रामचंद्र रायगुरु यांनी सांगितले.

कान्यालकडे पाकिस्तानी फोन असल्याचे आढळून आले आहे. हा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला गेला आहे. इस्लामाबादमध्ये रहात असताना त्याने पैशांसाठी काही महत्वाची माहिती “आयएसआय’ला पुरवली असल्याचा संशय असल्याचेही पोलिस अधिक्षकांनी सांगितले. तर कन्यालला उत्तर प्रदेशातील काही लष्करी ठिकाणांची माहिती मिळवण्यास सांगितले गेले होते, असे प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे, असे उत्तर प्रदेशचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी लखनौमध्ये सांगितले. त्याच्याकडे “आयएसआय’ने आणखी कोणती कामगिरी सोपवली होती, याबाबत सविस्तर चौकशीमध्ये अधिक माहिती समजू शकेल, असेही कुमार म्हणाले.

कन्यालवर कर्जाचा मोठा बोजा आहे. त्यासाठी त्याला पैशांची आवश्‍यकता होती. त्याने याच कारणास्तव हेरगिरी केली की अन्य कोणत्या कारणास्तव हे चौकशीमध्ये उघ्ड होईल, असेही ते म्हणाले.

भारतीय अधिकाऱ्याच्या फोन आणि लॅपटॉपमध्येही छेडाछेड केली गेली. भारतीय दूतावासामध्ये स्वच्छतेचे काम करणारे हंगामी कामगार रमेश कन्यालच्या संपर्कात असावेत, असा संशय आहे. भारतीय लष्करात असलेल्या भावाच्या माध्यमातून इस्लामाबादेतील भारतीय अधिकाऱ्याच्या घरी आपल्याला नोकरी मिळाल्याचे त्याने सांगितले. महत्वाची माहिती “आयएसआय’ला पुरवल्याचे त्याने कबुल केले आहे. तो करत असलेल्या देशविघातक कारवायांबाबतही माहिती त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली.

एका प्रकरणातून पुढे आले नाव 
उत्तर प्रदेश “एटीएस’ने महिन्याभरापूर्वी फैजाबादचा रहिवासी असलेल्या आफताबला लष्करी गुप्तचर संस्थांची हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आले होते. त्याच्या चौकशीच्यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे “आयएसआय’चे अन्य काही एजंटही “एटीएस’च्या रडारवर आले होते. यासंदर्भात “एटीएस’ने 20 मे रोजी “एफआयआर’दाखल केली आहे. याच तपासादरम्यान 22 मे रोजी रमेश कन्यालची चौकशी झाली होती आणि पिथोरगडमध्ये त्याच्या घराची झडतीही घेतली गेली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button