breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपची पहिली यादी, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे गायब

मुंबई |महाईन्यूज|

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं 125 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 52 विद्यमान आमदारांना पुन्हा यंदा संधी दिली आहे. तर पहिल्या यादीत 12 आमदारांचा पत्ता कट केला आहे. दरम्यान, पहिल्या यादीत एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश केलेला नाही. 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचं पहिल्या यादीत नाव नाही आहे. तसंच खडसेंच्या मुक्ताईनगर मतदासंघाचा देखील यादीत उल्लेख नाही आहे. यादी जाहीर होण्याआधी आज एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे खडसेंचं दुसऱ्या यादीत स्थान देण्यात येईल की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. 

माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचंही यादीत नाव नाही आहे. 2014 मध्ये घाटकोपर पूर्व मतदारसंघातून ते निवडून आले होते. मात्र त्यानंतर बऱ्याच वादात मेहता अडकले त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

दुसरीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नावाचा देखील उल्लेख केला नाही आहे. 2014 ला बोरिवलीमधून तावडे निवडून आले होते. मात्र खडसे आणि प्रकाश मेहतांप्रमाणेच बोरिवली मतदारसंघाचा यात समावेश नाही आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव देखील नसून 2004, 2009 आणि 2014 मध्ये चंद्रपूरमधील कामाठी मतदारसंघातून ते विजयी झालेत. मात्र बावनकुळे यांचं देखील नाव यादीत नाही आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button