breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक… खुलेआम काळाबाजार! 1500 रुपये द्या आणि अवघ्या 15 मिनिटांत मिळवा ई-पास

वसई: कोरोनाच्या नावाखाली ई-पासचा घोटाळा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघे बिनधास्तपणे ई-पासचा काळाबाजार करत होते. झेरॉक्सच्या दुकानात सर्रासपणे कसलीही भीती न बाळगता त्यांचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. नालासोपाला येथे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. ऐरवी ई-पास काढण्यासाठी 15 दिवस ते महिना लागतो. पाससाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, हे महाशय केवळ 15 मिनिटांत ई पास मिळवून देत होते. आणि त्यासाठी आरोपी 1500 रुपये घेत होते. 1500 रुपयांत कुणालाही 15 मिनिटांत ते पास मिळवून देत होते.

पोलिसांनी आता या ब्रिजेश दुबे आणि आणि अतिश गडा दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तुळींज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं की, हे दोघे किती दिवसांपासून ई पास काढून देत होते आणि त्यांनी कुणाकुणाला पास दिला आहे. याचा तपास पोलीस करत असून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व दत्तात्रय पाटील यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, असे पास साठी कोणाकडून पैसे उकळले असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. रामदेव झेरॉक्स सेंटरच्या मालकाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी एक धक्कादायक उत्तर दिलं आहे. ते म्हणजे, पास देण्यासाठी कोणी त्यांच्याकडे पास घ्या म्हणून सांगायला गेलं नव्हतं. त्यांना गरज होती म्हणून ते पास घेण्यासाठी आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button