breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदित्य बिर्ला रुग्णालयावर गुन्हा दाखल करा – अजित शेख यांची मागणी

पिंपरी- चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणूनरुग्णाला गेल्या ९ दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयांवर व रुग्णालयाच्या सीईओयांच्यावर फसवणूक व अपहरणाचा गुन्हादाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजिज  शेख यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, अजिज शेख,त्यांचे कार्यकर्ते तसेच रुग्ण दशरथ शिवाजी यांच्या नातेवाइकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.   

यासंदर्भात अजिज शेख यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,“दशरथ शिवाजी आरडे (वय ७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धांगवायूचाझटका आला होता. त्यामुळे त्यांना ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांनीरुग्णालयात दहा हजार रुपये भरले. तसेच रुग्णालयाने त्यांना औषधे बाहेरून आणण्यास लावले. त्यामुळे त्यांनी औषधांवरही हजारो रुपये खर्च केले आहेत. वास्तिवक दशरथ आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात मोफत उपचार होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे.आर्थिक दुर्बल घटकात मोडत असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दाखविले.

तरीही रुग्णालयाने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत. उपचारानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, उपचाराचा खर्चदेण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे रुग्णालयाने गेल्या नऊ दिवसांपासून त्यांना सोडलेले नाही. तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणेत्यांच्या नातेवाइकांनाही त्यांना भेटू दिले जात नाही. दशरथ आरडे यांना रुग्णालयातअक्षरशः डांबून ठेवले आहे. त्यामुळे रुग्णालयव्यवस्थापन व सीईओवर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

दरम्यान, अजिज शेख, त्यांचे कार्यकर्ते तसेच रुग्ण दशरथ शिवाजी यांच्या नातेवाइकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयात या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन सुरू केलेआहे. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली असून याविषयी लवकरच अहवाल मागविण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. तर याबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाशी संर्पक साधाण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button