breaking-newsआंतरराष्टीय

धक्कादायक! इराणमध्ये उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोनाची लागण, 3 खासदारांचा मृत्यू

तेहरान | महाईन्यूज

इराणमध्येही कोरोनानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. इराणच्या उपपंतप्रधानांपासून आरोग्यमंत्री आणि 25 खासदारही यापासून सुरक्षित राहू शकलेले नाहीत. या सर्वांनाच कोरोनाची लागण झाली आहे. चीन, इटलीनंतर आता इराणमध्येही कोरोनाने गंभीर रुप धारण केलं आहे. यात इराणच्या 3 खासदारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाही घडली आहे. याशिवाय ब्रिटनचे आरोग्यमंत्रीही कोरोनाचे शिकार झाले आहेत. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडालेली आहे.

कोरोनाच्या सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या जगभरातील देशांमध्ये इराणचा तिसरा लागतो आहे. चीन, इटलीनंतर इराणमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. याच इराणमधील उपआरोग्यमंत्री इराज हररिची यांना देखील कोरोना संसर्ग झाला. सर्वसामान्य लोकांमध्ये कोरोनाची भीती आहेच. मात्र, याहून भयानक म्हणजे इराणच्या 25 खासदारांनाही कोरोनाची लागण झाली. यातील 3 खासदारांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात इरणानी लॉमकर, फतेमेह रहबर आणि मोहम्मद मीर मोहम्मदी यांचा समावेश आहे.

जिथं आरोग्यमंत्री, उप आरोग्यमंत्री आणि खासदारांनाही कोरोनाची लागण होऊ शकते, त्या देशात कोरोनाचा फैलाव किती वेगानं होतोय हे अगदी स्पष्ट आहे. खासदारांचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं इराण सरकारही हादरलं आहे. इराणने आपल्या यंत्रणांना हायअलर्टवर ठेवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button