breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

….अतिरिक्त पदभार असलेल्या अधिका-यांना मिळणार न्याय – सभापती माधुरी कुलकर्णी

  • प्रशासनाचा लालफिती कारभार ; बढत्यांचे प्रस्ताव वर्षेानुवर्षे रेंगाळत ठेवले
  • अकार्यक्षम आयुक्तांमुळे आकृतीबंधला मिळेना मंजूरी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘सरकारी काम अनं सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्येय पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन विभागाच्या लालफिती कारभारामुळे दिसून येत आहे. महापालिकेच्या मुख्य अग्नीशामक अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, यासह स्थापत्य विभागातील काही कार्यकारी अभियंता पदाच्या जागा रिक्त असताना त्या जागेवर आयुक्तांना पदोन्नती समितीची बैठक घेवून सेवाज्येष्ठतेनूसार त्या-त्या पात्र अधिका-यांची वर्णी लावणे आवश्यक आहे. परंतू, त्या जागावर अधिका-यांची निवड करण्यास आयुक्तांसह प्रशासन विभागास वेळ मिळेना झाला आहे. दोन वर्षे होवूनही आकृती बंध ( सेवा प्रवेश नियमावली) शासनाने अद्याप मंजूरी दिली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा कारभार गतीमान होवून नागरिकांची कामे तात्काळ व्हावीत, याकरिता अतिरिक्त पदभार असलेल्या पात्र अधिका-यांना पदोन्नती देण्यास प्राधान्य दिले असून त्याला विधी समितीने आज ( शुक्रवारी) झालेल्या सभेत मान्यता दिली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती माधुरी कुलकर्णी होत्या. महापालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, मुख्य अग्नीशामक अधिकारी व काही कार्यकारी अभियंता पदे रिक्त आहेत. त्या पदांचा अतिरिक्त पदभार त्या-त्या विभागातील पात्र अधिका-यांना दिले आहेत. महापालिका प्रशासन विभागाने अधिका-यांना अतिरिक्त कामांचा बोजा देवून अनेकांना बढतीपासून वंचित ठेवले आहे. कित्येक अधिका-यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे वरिष्ठ पदावर पदोन्नतीस पात्र असतानाही प्रशासन विभागाच्या गलथान कारभारामुळे आणि पदोन्नती समितीला बैठकीस वेळ न मिळाल्याने अनेकांना बढती मिळेना झाली आहे.

सत्ताधारी भाजपने पारदर्शक व गतीमान कारभार करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रलंबित असलेला आकृतीबंध मंजूरीस पाठपुरावा सुरु केला आहे. परंतू, प्रशासनाच्या काही त्रुटीमुळे सेवा प्रवेश नियमावली मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे वरिष्ठ पदावर सेवाज्येष्ठतेनूसार पात्र असणा-या शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांना शिक्षणाधिकारी पदावर, अग्नीशामक विभागातील उपमुख्य अग्नीशमन अधिकारी किरण गावडे यांना मुख्य अग्नीशमन अधिकारी, तर स्थापत्याचे उपअभियंता दत्तात्रय रामगुडे यांना कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यास विधी समितीने मान्यता दिली आहे. तसेच हा ठराव महासभेच्या अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

 

महापालिका प्रशासनाचा कारभार गतीमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेवाज्येष्ठता व शैक्षणिक अर्हतेनूसार पात्र असणा-या अधिका-यांना त्या-त्या पदावर पदोन्नती दिल्यामुळे कनिष्ठ कर्मचा-यांनाही देखील पदोन्नतीचा संधी उपलब्ध होणार आहे. तसेच महापालिका प्रशासनाने अनेक विभागातील पदे रिक्त ठेवून त्याच विभागातील अधिका-यांना अतिरिक्त कामांचा पदभार सोपविला आहे. त्यामुळे कोणत्याच पदाचा सुरळीत कारभार होत नाही. कामांच्या अतिरिक्त ताणामुळे अनेक अधिका-यांना आरोग्याचा त्रास होवू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या ठरावाची वाट न पाहता माझ्याकडे आलेले सदस्य प्रस्तावांना आम्ही मान्यता दिली आहे. तसेच त्या पदावर बढती मिळाल्यामुळे कित्येक वर्षे पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या अधिका-यांना ख-या अर्थाने न्याय मिळणार आहे

माधुरी कुलकर्णी  सभापती , विधी समिती 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button