breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! आधी ओळख, मग मोठ्या नफ्याचं आमिष, झांबियातील भारतीयांकडून पुणेकर व्यवसायिकांना तब्बल पावणेदोन कोटींना गंडा

पुणे: ऐन कोरोनाच्या काळात झांबियात व्यवसाय असलेल्या दोन भारतीयांनी पुणे शहरातील व्यावसायिकांना तब्बल पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घातलेला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित व्यवसायिकांनी याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींनी पुण्यातील व्यापाऱ्यांकडून आधी शालेय वह्या, पीव्हीसी पाईप, सॅनिटायझर, इलेक्‍ट्रीकल वस्तू आदींची मागणी केली होती.

मात्र, पैसे अदा करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी हात वर केले आणि पोबारा केला आहे. एजाज रियाज शेरकर (49, रा. भंडारी लॅण्डमार्क, कोंढवा), प्रविण वसंत माटे (शोभा पार्क, कर्वेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्या दोघांचाही झांबियात व्यवसाय आहे. याप्रकरणी विकास मनोहर सावंत (59, रा. मॉडेल कॉलनी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.

तक्रारदार मनोहर सावंत यांचा इंडवे इंटरनॅशनल नावाचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. ते पत्नीसह भागीदारीमध्ये घरातूनच हा व्यवसाय करतात. त्यांची आरोपी एजाज शेरकर बरोबर 2016 मध्ये ओळख झालेली होती. शेरकर याने झांबिया येथे राहण्यास असून भारतातून वेगवेगळ्या मालाची आयात करुन विक्री करत असल्याचे सांगितले होते. या तक्रारीनंतर विदेशात व्यवसाय असल्याची बतावणी करुन अनेक व्यवसायिकांना गंडा घालण्याचा प्रकार उघड झालेला आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button