breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

दौंड ते लोणावळा परिसरातील सराईत गुंडांना पिंपरीत आश्रय, पोलिसांची हप्तेखोरी जोमात

  • माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचा धक्कादायक आरोप
  • पत्रकार परिषद घेऊन आसवानी बंधुंची केली पोलखोल

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दौड ते पुणे आणि लोणावळा ते पिंपरी या परिसरातील सराईत गुन्हेगारांसाठी पिंपरी कॅम्पातील बार, परमीट रूप रात्रभर, पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतात. हे बार आणि हॉटेल्स राजकीय पदाधिका-यांच्या मालकीची असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे हप्ते घेऊन पिंपरी पोलीस या गुन्हेगारीला आश्रय देत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे पिंपरीतील माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

https://www.facebook.com/mahaenews.in/videos/1000651550304078/

पिंपरी कॅम्पात साडेतीन ते चार हजार बोगस मतदार आहेत. त्यांच्याकडे ओटर आयडी, पॅन कार्ड सर्वकाही आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी हे बोगस मतदार मतदान करताना आढळून आले. हा प्रकार रोखला असता नगरसेवक डब्बू आसवानी यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेचे उमेदवार माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आसवानी यांच्या कार्यकर्त्यांनी चाबुकस्वारांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. मारहाण करणा-या गुन्हेगारांना पोलिसांच्या समोर हजर केले असता त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना सोडून देण्यात आले, असा आरोप चाबुकस्वार यांनी पोलिसांवर केला.

आसवानी कुटुंबातील आठ भाऊ आहेत. त्यांच्यावर 67 गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासंदर्भात मी स्वतः पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई यांच्याकडे तक्रार केली. तत्कालीन आयुक्त पद्मनाभन यांच्याकडे देखील आठ ते दहावेळा तक्रार केली. तरी, पोलिसांनी यांचा बंदोबस्त केला नाही. पिंपरीतील त्यांचे बार, परमीट रुम रात्रभर सुरू असतात. गुन्हेगारांना याठिकाणी रात्रीअपरात्री मद्य प्राशण करायला मिळते, हे माहित आहे. म्हणून दौंड ते पुणे आणि लोणावळा ते पिंपरी परिसरातील सराईत गुन्हेगार याठिकाणी दारू पिण्यासाठी रात्री अपरात्री येत असतात. आसवानी बंधुंमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. पोलिसांना लाखो रुपयांचे हप्ते चालू आहेत. म्हणून पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. यात पोलीस आयुक्त ते सहायक पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या अधिका-यांनी पैसे खाल्ले आहेत. म्हणून आम्ही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागितली, असे चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button