breaking-newsमहाराष्ट्र

भाजप नगरसेविका शांताताई हिरे यांचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

नाशिक |महाईन्यूज|

भाजपच्या नगरसेविका शांताताई हिरे यांचा मृत्यू झाला आहे. विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. फुलेनगर परिसरातील प्रभाग 4मधील त्या नगरसेविका होत्या.

शांताताई हिरे या प्रभाग 4 मधील नगरसेविका होत्या. पण काही दिवसांपासून त्या आजारांनी ग्रासल्या होत्या. रोजच्या दुखण्याला आणि आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शांताताई यांच्या कामाची संपूर्ण नाशिकमध्ये चर्चा आहे. सभागृहामध्ये त्या कायम नागरिकांचे प्रश्न मांडायच्या. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शांताताई हिरे या 2017ला पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्या सगळ्यांशी हसून खेळून राहायच्या. प्रत्येक नागरिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. काम चांगलं असतानाही त्या आजारामुळे कंटाळल्या होत्या. अखेर या सगळ्या आजाराला थांबवण्यासाठी त्यांनी आत्महत्या हा शेवटचा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी शांताताई यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button