breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भीमशक्तीनगर झोपडपट्टी जागा बळकविण्याचा प्रयत्न

राजकारणी आणि बांधकाम व्यवसायीकाचा डोळा

पिंपरी । प्रतिनिधी

भिमशक्ती नगर (पेठ क्रमांक 20 प्राधिकरण) येथील झोपडपट्टीची जागा बळकवीण्याचा प्रयत्न सुरु आहे. रहिवाशांना घरे बांधून देऊ, शाळा, हॉस्पिटल, खेळण्याचे मैदान, उद्यान बांधून देऊ असे अमिष दाखवून झोपडपट्टीची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी सत्तारुढ पक्षनेते व काही बांधकाम व्यवसायिक यांचा त्या जागेवर डोळा असून त्यांचा उद्देश आहे. त्याला नागरिकांचा विरोध असून आम्ही तीव्र विरोध करू, असा इशारा रहिवाशी सचिन शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.  

निवेदनात नमूद केले आहे की, प्रत्यक्षात ही झोपडपट्टी रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती या प्रकल्पाविरोधात न्यायालयात गेल्यास हा प्रकल्प रखडेल. तसेच या झोपडपट्टी मधील अनेक रहिवाश्यांचे छोटे व्यवसाय आहेत. प्रकल्प झाल्यास या रहिवाश्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. त्याच बरोबर अनेकांकडे शेळ्या, कोंबड्या, गाई ,म्हशी अशी जनावरे आहेत. यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. अशा लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. प्रत्येक्षात चिखली परिसरात अनेक ठिकाणी रुग्णालये, शाळा, मैदान, उद्यान यांच्या साठी आरक्षणे आहेत. या जागा रिकाम्या आहे. त्या जागेस विकास करण्यासाठी प्राधान्य द्यावे. असे न करता भिमशक्ती नगर येथे एसआरए अंतर्गत प्रकल्प उभारण्याचे अमिष दाखवून राजकारणी सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. बांधकाम व्यवासायिकांना हाताशी धरुन प्राधिकरणाच्या मालकीची भुखंडाची जागा हडपण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रकाराला संपूर्ण भिमशक्ती नगर झोपडपट्टी रहिवाशांचा विरोध असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button