breaking-newsआंतरराष्टीय

नेपाळ सरकार नव्या नकाशाच्या प्रती संयुक्त राष्ट्र आणि गुगलला पाठवणार

काठमांडू – नेपाळने नवा नकाशा प्रसिद्ध करत लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारताच्या भूभागावर दावा केल्याने दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यात आता नेपाळ सरकार या नव्या नकाशाच्या प्रती संयुक्त राष्ट्र (यूएन) आणि गुगलला पाठवणार आहे.

नेपाळच्या मंत्री पद्म अर्याल म्हणाले की, आम्ही नव्या नकाशाच्या प्रती यूएन एजन्सीज आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठवणार आहोत. ही प्रकिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण होईल, नव्या नकाशाच्या इंग्रजी भाषेमध्ये 4 हजार प्रत तयार करण्यात येत आहेत. नेपाळ मापन विभागाने नकाशाच्या 25 हजार प्रत छापल्या असून त्या जगभरात वितरीत करण्यात येणार आहेत. प्रांतीय आणि इतर सर्व सार्वजनिक कार्यालयांना प्रती विनामूल्य दिल्या जातील तर नागरिक नेपाळी चलनातील 50 रुपयांत एक प्रत खरेदी करू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button