breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सेल्सगर्ल ते अर्थमंत्री… निर्मला सीतारामन यांचा प्रेरणादायी प्रवास

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारचं पहिलं बजेट सादर करणार आहेत. निर्मला सीतरामन यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी घेताच एक नवं रेकॉर्ड झालं होतं. कारण, अर्थमंत्रिपदाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. याआधी, देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री होण्याचा मान हा निर्मला सीतारामन यांच्याच नावावर आहे.

सेल्सगर्ल ते संरक्षणमंत्री

राजकारणात येण्यापूर्वी निर्मला सीतारामन या सेल्सगर्लचं काम करत होत्या. त्यांचा सेल्सगर्ल ते अर्थमंत्रिपदापर्यतचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. निर्मला सीतारामन यांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. त्यामुळे त्यांचं बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. जेएनयु विद्यापीठातून त्यांनी एमए इकॉनॉमिक्सची डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी एमफिल केलं. त्यांचं लग्न हे डॉक्टर पराकाला प्रभाकर यांच्याशी झालं. या दोघांची जेएनयुमध्ये ओळख झाली होती.

डॉक्टर प्रभाकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर निर्मला सीतारामन लंडनमध्ये राहू लागल्या. लंडनमध्ये असताना निर्मला सीतारामन या एका दुकानामध्ये सेल्सगर्लचं काम करत होत्या, असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सनं दिलं आहे. त्यानंतर त्यांनी PricewaterhouseCoopersमध्ये सीनिअर मॅनेजरचीही नोकरी केली.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी निर्मला सीतारामन 2003 ते 2005 या काळात नॅशनल कमिशन फॉर वुमनच्या सदस्या राहिल्या आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजू ठामपणे मांडली. त्यानंतर 2014मध्ये भाजप सत्तेत आलं आणि त्यांना कॅबिनेटमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. 2016मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या.गोव्यामध्ये भाजप सरकार बनवण्यासाठी मनोहर पर्रिकर यांना पुन्हा एकदा गोव्यात पाठवण्यात आलं. त्यानंतर 3 सप्टेंबर 2017 रोजी निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री झाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button