breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात गेल्या २४ तासांत २ हजारहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ९७४ ने भर पडली आहे. तर गेल्या २४ तासात २ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ६ हजार ९२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५४ हजार ०६५ वर गेला आहे. त्यापैकी एकूण १ लाख ८६ हजार ९३५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१७ जून) दिली आहे.

देशात अनलॉक झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत १ लाख ४६ हजार ४५० ची वाढ झाली आहे तर मृतांची संख्या ४ हजार ४१६ ने वाढली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ५२.७९ टक्के झाला आहे. राज्यात काल कोरोनाच्या २ हजार ७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल (१६जून) राज्यात १ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ४४५ इतकी झाली आहे. यापैकी ५० हजार ४४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button