breaking-newsपुणे

देशातील पहिल्या टेस्ट टय़ूब बेबीचा सन्मान

डॉ. सुभाष मुखर्जी यांनी आयव्हीएफ तंत्र विकसित करण्यासाठी दिलेल्या मौल्यवान योगदानामुळे मी या जगात जन्म घेऊ शकले, मात्र या संशोधनातील नोबेल पारितोषिकासाठी डॉ. मुखर्जी नव्हे तर एका परदेशी शास्त्रज्ञाचे नाव निश्चित करण्यात आले. डॉ. मुखर्जी आणि माझे पालक यांनी धोका पत्करला नसता तर मी हे जग पाहू शकले नसते. त्यामुळे संशोधन करण्यासाठी अनेक तरुण शास्त्रज्ञांनी पुढे येऊन यश किंवा अपयशाची भीती न बाळगता धोका पत्करण्याची गरज आहे, अशी भावना देशातील पहिली टेस्ट टय़ूब बेबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कनुप्रिया अगरवाल यांनी शनिवारी व्यक्त केली.डॉ. खुर्द फर्टिलिटी, आयव्हीएफ सेंटर आणि लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डीटू यांच्या वतीने आयोजित टेस्ट टय़ूब बेबी – समज आणि गैरसमज या कार्यक्रमात अगरवाल यांच्या चाळिसाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी कनुप्रिया यांच्या जन्माबाबतच्या संशोधनामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. सुभाष मुखर्जी यांच्यासह एंब्रियोलॉजिस्ट म्हणून काम केलेले डॉ. सुनीत कुमार मुखर्जी, महापौर मुक्ता टिळक आणि डॉक्टर उपस्थित होते. डॉ. सुनीत कुमार मुखर्जी म्हणाले, डॉ. सुभाष मुखर्जी यांनी आयव्हीएफ तंत्र विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या संशोधनामुळे लक्षावधी कुटुंबांनी अपत्यप्राप्तीचा आनंद मिळविला आहे. मुक्ता टिळक म्हणाल्या, भारतीय शास्त्रज्ञ परदेशातील शास्त्रज्ञांच्या बरोबरीने संशोधन करु शकतात याचा पुरावा म्हणजे कनुप्रिया यांचा जन्म असून अशा संशोधनाला पाठबळ देणे नागरिकांचे कर्तव्य आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button