breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट

डहाणू – डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेला हा स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरली आहेत. तसेच स्फोटात दहा जण भाजले असून एक जण गंभीररीत्या जखमी आहे. सर्व जखमींना डहाणू आशागड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना मोठे धक्के जाणवले.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागल्याने हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना मोठे धक्के जाणवले. दरम्यान, कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button