breaking-newsराष्ट्रिय

देशातील पहिली महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एसआय पद्मावती यांचे निधन

नवी दिल्ली – देशातील पहिली महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एसआय पद्मावती यांचे काल वयाच्या 103व्या वर्षी निधन झाले. 11 दिवसांपूर्वी त्यांना नॅशनल हार्ट इन्स्टिटयूटमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. पद्मावती यांना दोन्ही फुफ्फुसात गंभीर संक्रमण झाले होते. त्यामुळे त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ओ. पी. यादव यांनी सांगितले. डॉ. पद्मावती यांच्यावर पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महान हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पद्मावती या शेवटपर्यंत एक सक्रिय आणि निरोगी जीवन जगल्या. 2015च्या अखेरीस त्या आठ्वड्यातून पाच दिवस, दिवसाचे 12 तास एनएचआयमध्ये काम करत होत्या. त्यांनी 1981मध्ये एनएचआयची स्थापना केली होती. त्यांच्या योगदानामुळेच त्यांना कार्डिओलॉजीची गॉडमदर ही पदवी देण्यात आली होती. भारत सरकारने 1967मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1992मध्ये पद्मविभूषणाने सन्मानित केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button