TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशभरात सोने खरेदीसाठी आता ओळखपत्र गरजेचे, सराफांचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.

आगामी काळात सोने-चांदीच्या दागिने खरेदीसाठी आर्थिक व्यवहारांप्रमाणे KYC सादर करावे लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने 28 डिसेंबरला सोन्याच्या व्यापाराला PMLA (Prevention of Money Laundering Act) कायद्याच्या अखत्यारित आणल्याची अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे आता ईडीला कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची तपासणी करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

या आदेशानुसार आता पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना 10 लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button