breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशभक्तीची नशा करावी, पण ‘मोदीजींसारखे लग्न करू नये, इतकी नशा असू नये’ – कैलास विजयवर्गीय

नवी दिल्ली ।

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील निवेदनानंतर पुन्हा चर्चेत आले आहेत. लोकांना ड्रग्सऐवजी देशभक्तीच्या नशएची शिकवण देणारे कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, नशा करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु देशभक्तीची नशा इतकीही असू नये की मोदीजींप्रमाणे लग्नच करू नये.

खरं तर, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मादक पदार्थांच्या व्यसनाविरूद्ध मॅरेथॉन शर्यतीनंतर भाजप नेते विजयवर्गीय यांचे भाषण देत होते आणि तरुणांना नशा करू नका असे आवाहन करीत होते. यावेळी ते म्हणाले की, नशा करणे ही चांगली गोष्ट आहे पण ही नशा काम करण्याची आणि देशप्रेमाची असली पाहिजे.

पुढे ते म्हणाले की, ‘मोदीजींसारखे लग्न करू नये इतकी नशा असू नये’. कैलास विजयवर्गीय आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी इंदूरच्या प्रसिद्ध पोह्यांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतर त्यांना विरोधाच्या सामना करावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button