breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम रद्द करणार – काॅंग्रेसचा जाहिरनामा प्रसिध्द

नवी दिल्ली – सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचे कलम १२४ अ रद्द करू असे आश्वासन मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. काँग्रेसच्या या आश्वासनामुळे वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने मंगळवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘जन आवाज’ असे जाहीरनाम्याला नाव दिलेय तर ‘हम निभाएंगे’ असं जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्वासन देण्यात आले आलेले आहे. यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

मंगळवारी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात नागरिकांचे आधिकार संतुलत करण्यासाठी संशोधनात्मक अभ्यास करून काही कायद्यांमध्ये बदल करू असे सांगितले आहे. यापैकी देशद्रोहाचे कलम १२४ अ आणि AFSPA रद्द करू असे सांगितले. या दोन्हीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कलम १२४ अ नुसार एखाद्या व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला चालवला जातो. १२४ अ कलमाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. नंतर आलेल्या काही कलमामुळे १२४ अ चे महत्व कमी झाले आहे, असे म्हणत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात १२४ अ रद्द करू असे आश्वासन दिले आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यावर १२४ अ नुसार खटला सुरू आहे.

काय आहे कलम १२४ अ. – 
भारतात कायद्याद्वारे स्थापित झालेल्या सरकारविरोधात कोणीही, शब्दांनी, लिखित अथवा वाचिक, किंवा काही चिन्हांनी अथवा दृश्य प्रातिनिधिकतेने, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल अथवा सरकारचा अवमान करत असेल किंवा सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अथवा असंतोष निर्माण करत असेल, तर त्यास आजीवन कारावास, ज्यात आíथक दंडाचाही समावेश असेल, किंवा तीन वर्षांचा कारावास व आर्थिक दंड किंवा आर्थिक दंड, ही शिक्षा केली जावी.

राहुल गांधींच्या घोषणा –

– काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देणार
– पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार
– शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणार
– मार्च 2020 पर्यंत 22 हजार पदे भरली जाणार
– गरिबीवर वार, 72 हजार, या नुसार एका वर्षा ७२ हजार, तर ५ वर्षांमध्ये एकूण ३.६० लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार
– काँग्रेस पार्टी मार्च 2020 पर्यंत देशातील सरकारी खात्यात 22 लाख नोकऱ्या देणार
– 10 लाख युवांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या देणार
– काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
– गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची काँग्रेसची हमी, गरिबांचं किमान उत्पन्न 72 हजार करु
– तरुणांना उद्योगांसाठी 3 वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील.
– शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button