breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ

विजय शुगरचे धनादेश प्रकरण, कोर्टाने अर्ज फेटाळल्याने अडचणी वाढल्या

सोलापूर |महाईन्यूज|

पंढरपूरच्या विजय शुगरने दिलेला ५ कोटी ९४ लाख ७३ हजार ७६२ रुपयांचा धनादेश न वटल्यामुळे विठ्ठल साखर कारखान्याने दाखल केलेल्या फौजदारी गुन्ह्यातून दोषमुक्ती व्हावी यासाठी माजी उपमुख्यमंत्री तथा विजय शुगरचे संचालक विजयसिंह मोहिते-पाटील व कार्यकारी संचालक आसबे यांनी दिलेला अर्ज पंढरपूर न्यायालयाचे न्यायाधीश ए.पी.कराड यांनी फेटाळला आहे.

विठ्ठल कारखान्याचे अॅड. रामलिंग कोष्टी यांनी ही माहिती दिली. अर्ज फेटाळल्यामुळे मोहिते पाटलांच्या अडचणीत वाढ झाली आहे तर दुसरीकडे सध्या आर्थिक अडचणीमुळे बंद असलेल्या विठ्ठल कारखान्यास विजय शुगर्स कडून पैसे मिळण्याची थोडीफार अशा पल्लवित झाली आहे.

दोघांच्या अर्जावर संचालकांच्या वतीने अॅड.कुलकर्णी, अॅड.दिलीप फडे, अॅड.नितीन खराडे यांनी युक्तिवाद केला. तर विठ्ठल कारखान्याच्या वतीने अँड.रामलिंग कोष्टी यांनी बाजू मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button