breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘देवी’ चा ‘ट्रेलर लॉंच…अत्याचाराने पीडित असलेल्या नऊ महिलांची कहाणी…

अभिनेत्री काजोलने तिची पहिली शॉर्ट फिल्म ‘देवी’चा फर्स्ट लूक आणि बिहाइंड द सीन फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते..यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे…या चित्रपटात एक-दोन नव्हे तर तब्बल 9 अभिनेत्रींनी काम केलं आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रियंका बॅनर्जी यांनी केले आहे.

‘देवी’ ही छोट्या-छोट्या खोलीत राहणा-या अत्याचाराने पीडित असलेल्या नऊ महिलांची कहाणी आहे. या सर्व महिला विविध स्तरातून आल्याचं दाखवण्यात आलं आहे… त्यांना त्यांच्या व्यथा सांगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.

श्रुती हसन आणि काजोल यांची ही पहिलीच शॉर्ट फिल्म आहे. त्यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री मुक्ता बर्वे, नीना कुळकर्णी, रमा जोशी यांनी काम केले आहे. मुक्ता बर्वेने या फिल्ममध्ये मुस्लिम महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय नेहा धुपिया, शिवानी रघुवंशी आणि यशस्वनी दायमा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत

निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. अवघ्या दोन दिवसांत या फिल्मचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीणच वाढली आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button