breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपुरात कोट्यवधींच्या शेतीची केली विक्री

नागपूर | महाईन्यूज

झारखंडमधील एका व्यक्तीने सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती शेती परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेषनाथ जोगेश्वरसिंग ठाकूर (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो जगदीशनगर (काटोल मार्ग) मधील कालिमाता नगरात राहतो. प्रेमशंकर सीताराम चौधरी (वय ६५) हे शनी मंदिरजवळ रांची (झारखंड) येथे राहतात. त्यांचा पुतण्या अखिलेश प्रयागराज चौधरी येथील वर्धमाननगरातील श्रीजी दर्शन अपार्टमेंटमध्ये राहतो. अखिलेश यांनी मौजा पावनगाव (ता. कामठी) येथील उमेश श्रावण पिंपळखेडे, विकास श्रावण पिंपळखेडे आणि मनोज श्रावण पिंपळखेडे यांची शेती (क्र. ४९, खसरा नं. ५१/ १) खरेदी केले होते. तेव्हापासून शेतीची मालकी अखिलेश चौधरी यांच्याकडे होती.

२०१४ मध्ये प्रेमशंकर चौधरी झारखंडमधून नागपुरात आले. त्यांनी ही शेती त्यावेळी पुतण्याकडून बघितली अन् विकत घेतली. २७ लाख, ५१ हजारात हा सौदा झाला अन् त्याचे रीतसर विक्रीपत्रही करण्यात आले. शेषनाथ जोगेश्वरसिंग ठाकूर या आरोपीने अलिकडे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती जमीन संबंध नसताना सुनील बोरकर यांना विकली. ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर पीएसआय पाटवदकर यांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले असून, त्यांनी आपल्या बचावासाठी काही दलाल कामी लावल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ठाकूर हा ७५ वर्षांचा आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस शनिवारी त्याच्या घरी गेले होते. मात्र, तो आढळला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button