breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देवदर्शनासाठी निघालेल्या मोटारीला अपघात; पिंपरीतील दोन डॉक्टरांचा मृत्यू

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या डॉक्टरांच्या मोटारीला अपघात होऊन पिंपरी-चिंचवडमधील दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथे आज रविवारी (दि. 18) पहाटे घडला.

युवराज विलास घाटोळे (वय 40, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी. मूळ रा. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यासह अन्य एका डॉक्टरचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमी डॉक्टरांची नावे समजू शकली नाहीत.

युवराज घाटोळे शनिवारी (दि. 17) रात्री काम अटोपून आपल्या चार डॉक्टर मित्रांसह कारने गणपतीपुळ्याला निघाले. पारगाव खंडाळा येथे रविवारी पहाटे एकच्या सुमारास त्यांच्या कारचा टायर फुटला. त्यामध्ये समोरील बाजूला बसलेल्या युवराज घाटोळे यांच्यासह आणखी एका डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला.

डॉ. युवराज घाटोळे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या चुलत्यांसोबत काळावाडी येथील ड्राईव्हर कॉलनी येथे रहात होते. त्यांचे डांगे चौक येथे स्वतःचे रुग्णालय होते. डॉ. युवराज हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याच्या मंगेवाडीचे राहणारे असल्याने त्यांच्या पार्थिवावर मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button