breaking-newsक्रिडा

दुहेरीत भारताचे रोहन बोपन्ना-दिवीज शरण अंतिम फेरीत

  • टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा

पुणे – एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण, ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला असून रोहन बोपन्ना-दिवीज शरण व ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांच्यात विजेतेपदासाठी लढत होइल.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत उपांत्य फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताच्या अव्वल मानांकित रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीने इटलीच्या सिमॉन बोलेल्ली व क्रोएशियाच्या इवान दोडीज यांचा सुपरटायब्रेकमध्ये 6-3, 3-6, 15-13 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

1 तास 33 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 4-3 अशा फरकाने आघाडीवर असलेल्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी सिमॉन बोलेल्ली व इवान दोडीज यांची आठव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत सिमॉन बोलेल्ली व इवान दोडीज यांनी रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. उत्कंठावर्धक झालेल्या सुपरटायब्रेकमध्ये रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी सुरेख खेळ केला.

रोहन व दिवीज यांनी दोन मॅच पॉईंट्‌स वाचवले, तर पाचव्या मॅच पॉईंट्‌सवर 15-13 अशा फरकाने या जोडीने विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीने स्पेनच्या गेरार्ड ग्रनॉलर्स व मार्सेल ग्रनॉलर्स या जोडीचा 6-4, 3-6, 10-6असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1 तास 22 मिनिटे चालला. अंतिम फेरीत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांचा सामना ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा यांच्याशी होणार आहे.

सविस्तर निकाल

दुहेरी गट : उपांत्य फेरी : लूक बांब्रिज(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमारा(ग्रेट ब्रिटन) वि.वि.गेरार्ड ग्रनॉलर्स(स्पेन)/मार्सेल ग्रनॉलर्स(स्पेन) 6-4, 3-6, 10-6, रोहन बोपन्ना(भारत)/दिवीज शरण(भारत)(1)वि.वि. सिमॉन बोलेल्ली(इटली)/इवान दोडीज(क्रोएशिया) 6-3, 3-6, 15-13.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button