breaking-newsआंतरराष्टीय
दुसऱ्या तिमाहीत चीनचा विकास दर मंदावला
बिजींग: चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर मंदावला आहे. अमेरिकेशी सुरू झालेल्या व्यापार युदधाने चीनच्या अर्थिक उलाढालीला चालना मिळाली असली तरी हे व्यापार युद्ध असेच कायम राहिले तर चीनच्या आर्थिक विकासाला ते बाधक ठरणार आहे असा इशाराही काही तज्ज्ञांनी दिला आहे. तथापी चीनने जे 6.5 टक्के जीडीपीचे उद्दीष्ठ ठेवले आहे त्याच्या सुसंगत असा सध्याचा आर्थिक विकासाचा दर असला तरी त्यात अपेक्षित वाढ झालेली नाहीं ही चीनी अर्थतज्ज्ञांना चिंतेची बाब वाटत आहे.
चीनच्या आर्थिक स्थितीपुढे सध्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील आर्थिक आव्हानाचे मोठे सावट आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. चीनचा शेअर बाजार ढासळत असून त्यांच्या युआन या चलनावरही सध्या मोठा दबाव आहे. त्यामुळे चीनपुढील आर्थिक संकट गहिरे होत जाणार आहे असेही चिनी अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेबरोबरच्या आर्थिक व्यापार युद्धामुळे चीनी अर्थव्यवस्थेवर भविष्यात मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यापुढील तिमाहीचा निकाल काय लागतो ते पहाणे चीनसाठी महत्वाचे ठरणार आहे.