breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दुध दरवाढीसाठी संभाजी बिग्रेडचे आंदोलन

पिंपरी –  शेतक-यांच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान मिळालेच पाहिजे या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर संभाजी बिग्रेडच्या वतीने डांगे चैाकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड अप्पर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

शासनाकडून सध्‍याचे दुधाला 17 रूपये प्रतिलिटरप्रमाणे दर देण्‍यात आले आहेत. ढेपेचे वाढीव दर व चार्‍यांची टंचाई लक्षात घेता शासनाने दिलेले दुधाचे दर परवडणारे नसुन शेतकर्‍यांना तब्‍बल 28 रूपये प्रतिलिटरप्रमाणे दुधाचे दर देण्‍यात यावे या मागणीसाठी संभाजी बिग्रेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सतीश काळे, शहर कार्याध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष प्रवीण बो-हाडे, अक्षय गायकवाड, भैय्या जगधने, शेकापचे हरिष मोरे, बाळ पडवळ, विनोद घोडके, नारायण खांबकर, मुकेश बोबडे, सदाशिव लोभे, सुमित वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button