breaking-newsराष्ट्रिय

तैयब मेहता यांच्या ‘काली’ची २६ कोटींना विक्री

नवी दिल्ली: प्रख्यात आधुनिक चित्रकार तैयब मेहता यांचे ‘काली’ या चित्राची २६.४ कोटीला विक्री करण्यात आली असून लिलावात विकल्या गेलेले मेहता यांचे हे आजवरचे सर्वात महागडे चित्र ठरले आहे. लिलाव करणारी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी सॅफ्रोनार्टने या लिलावाबाबतची माहिती दिली.

या चित्राची बोली १९.८ कोटींपासून सुरू झाली आणि २६.४ कोटींवर थांबली. लिलावामध्ये विकल्या गेलेले मेहता यांचे हे सर्वात महागडी चित्र ठरले आहे. २०१७ मध्ये त्यांचे आणखी एक अनटायटल्ड पेंटिंग नावाचे चित्र २२.९९ कोटींना विकले गेले होते. तर २००२ मध्ये ‘सेलिब्रेशन’ नावाचे आणखी एक चित्र १.५ कोटींना विकल्या गेले होते.

मात्र ‘काली’ने त्यांच्या आजवरच्या चित्रांच्या विक्रीचे रेकॉर्ड मोडले आहे. उभ्या आकारातील तीन कलाकृतींपैकी त्यांची काली ही एक महत्त्वाची कलाकृती आहे. यापूर्वी हे चित्र महान रंगकर्मी इब्राहिम अलकाजी यांच्या कलेक्शनमध्ये होते. या चित्रात मनुष्याची द्विधा मनस्थिती रेखाटलेली आहे. चांगले-वाईट आणि विनाश यामधील स्थिती या चित्रातून रेखाटण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button