breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाच्या ५७ उमेदवारांची यादी जाहीर…एकाही मुस्लिम उमेदवाराचा यादीत समावेश नाही…

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी भाजपाने शुक्रवारी आपल्या ५७ उमेदवारांची यादी जारी केली. पक्षाने विजयासाठी उमेदवारांचे जातीय समीकरण, प्रतिमेला लक्षात घेऊन उमेदवार निश्चित केले. यादीत बहुतांश जुनेच चेहरे असल्याचे दिसून येते. आम आदमी पार्टीतून आलेल्या दोन माजी आमदारांना तिकीट दिले. चार महिला, ११ एससी, २ शीख व १५ विद्यमान आणि माजी नगरसेवकांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

५७ उमेदवारांच्या यादीत एकही मुस्लिम उमेदवाराला स्थान देण्यात आले नाही. केजरीवाल यांच्या मतदारसंघात काेणाला उभे केले जाईल, हे भाजपने गुलदस्त्यात ठेवले आहे. आपचे राघव चढ्ढा यांना आर. बी. सिंह टक्कर देतील. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचा रवी नेगी यांच्याशी मुकाबला पाहायला मिळेल. आम आदमी पार्टीचे सौरभ भारद्वाज यांच्या विरोधात शिखा राय लढणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी शुक्रवारी नावाची घोषणा करताना उर्वरित १३ जागांवरील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केले जाणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल मिळून लढतील. सूत्रांच्या मते दिल्लीतील ७० विधानसभा जागांपैकी ४ जागांवर राजद निवडणूक लढवेल. ईशान्य, बिहारी मतदारांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातील मतदारसंघ राजदच्या खात्यावर आहे. राजद दिल्लीच्या बुराडी, करावलनगर, उत्तमनगर, पालम मतदारसंघातून उमेदवार उतरवेल. दोन्ही पक्षांतील करारानुसार राजदला आणखी एक जागा हवी आहे. राजदला तिमारपूरची जागाही काँग्रेसकडून हवी आहे. दिल्लीत ईशान्येतील मतदारांची संख्या २५ टक्क्यांहून जास्त आहे. अनेक जागांवरील जय-पराजयाचा फैसला थेट पूर्वांचलातील मतदारांच्या हाती आहे. गेल्या निवडणुकीत आपच्या विजयात बिहार आणि ईशान्येतील मतदारांचा मोठा वाटा राहिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button