breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

  • बहुजन सम्राट सेनेच्या संतोष निसर्गंध यांची मागणी
  • भोसरीत रोहित्राच्या शॉकमुळे बारा वर्षांचा मुलगा जखमीप्रकरणी कारवाईची मागणी

पिंपरी : प्रतिनिधी

महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील विद्युत अपघातांची मालिका सुरुच आहे. भोसरी-निगडी रस्त्यावरील क्वॉलिटी सर्कल येथे मंगळवारी (दि.२३) दुपारी रोहित्राचा शॉक बसून बारा वर्षांचा मुलगा जखमी झाला. महावितरण अधिकाऱ्यांचा गलथान कारभार नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे संबंधित महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी निवेदनाद्वारे केली.

वाचा :-ताथवडे, पुनावळे, भूमकर चौकात सब-वे करा’, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

या मागणीचे निवेदन भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिले आहे.निवेदनात नमुद केले आहे की, भोसरी- निगडी रस्त्यावर रोहित्राचा शॉक बसल्याने मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर महावितरणच्या वतीने तातडीने उघड्या रोहित्राला झाकण बसवून घटना दाबण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी अभियंता गवारे यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी निसर्गध यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे केली आहे. या अगोदरही अशा अनेक घटना घडल्या आहेत. तरीही त्याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांचा जीव स्वस्त झाला आहे का? असा संतप्त सवाल निसर्गंध यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा, निसर्गंध यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button