breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीत कारखान्यातील सेप्टिक टँक साफ करताना २ कामगारांचा मृत्यू

नवी दिल्ली– दिल्लीच्या आदर्शनगर भागात असलेल्या एका कारखान्यातील सेप्टिक टँक साफ करताना २ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल उशिरा घडली. तर ३ कामगारांची प्रकृती गंभीर असून इजरीस आणि सलीम अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. जखमी कामगारांना बाबू जगजीवन राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आदर्शनगर भागातील लालबागच्या हंस सिनेमागृहाजवळ सोन्याची चेन तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातून निघणाऱ्या केमिकलला या सेप्टिक टँकमध्ये टाकले जाते. ही टँक जवळपास २० फूट खोल आहे. रविवारी रात्री या टँकच्या सफाईसाठी ५ कामगारांना बोलवण्यात आले होते. सफाईदरम्यान तीन कामगार टँकमध्ये उतरले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते बाहेर न आल्यामुळे उर्वरित दोन कामगार त्यांना पाहण्यासाठी टँकमध्ये उतरले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर तीन कामगार हे अत्यवस्थ आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button