breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीतील फॅक्टरीला भीषण आग; इमारत कोसळल्याने अग्निशमन दलाचे जवानही अडकले

नवी दिल्ली | दिल्लीच्या फॅक्टरींमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज सकाळी पीरागढी भागातील एका फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे इमारत कोसळल्याने यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसह अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, पीरागढी भागात एका फॅक्टरीला आग लागल्याचे समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. याचवेळी इमारतीमध्ये मोठा स्फोट झाला आणि इमारत कोसळली. या इमारतीखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये अग्निशमन दलाचे जवानही असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी बचावकार्य़ सुरू असून 30 ते 35 अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button