breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीतील प्रदुषित हवेमुळे तरुणीला कर्करोगाची लागण

धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे दिल्लीतील हवा ही दिवसेंदिवस जीवघेणी होऊ लागली आहे. या  प्रदुषित हवेमुळे एका तरुणीला कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासल्याची बाब समोर आली आहे. दिल्लीतील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील प्रदुषित हवेमुळे लोकांमध्ये फुप्फुसांचा आजार बळावत चालला आहे. सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी एका तरुणीच्या फुप्फुसांना कर्करोगाचे निदान झाल्याचे म्हटले आहे. तसेच दिल्लीतील ही पहिलीच घटना असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सर गंगाराम रुग्णालयातील सेंटर फॉर चेस्ट सर्जरीचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांनी हा दावा केला आहे.

डॉ. अरविंद कुमार म्हणाले, गेल्या आठवड्यात माझ्या ओपीडीत एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत काम करणारी २८ वर्षीय तरुणी तपासणीसाठी आली होती. ही तरुणी जन्मापासून वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासह गाजीपूर येथे राहत होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब पश्चिम दिल्लीत रहायला गेले. या मुलीच्या कुटुंबात कोणीही धुम्रपान करीत नाही. तरीही या मुलीला कर्करोगाचे निदान कसे झाले? याचा अभ्यास केल्यानंतर त्याला दिल्लीतील वायू प्रदुषण कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. नुकतेच केंद्र सरकारने लोकसभेत दिल्लीतील प्रदुषित हवेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जगातील सर्व मानवाच्या शरीराची संरचना एकसारखीच आहे. यामध्ये हवा प्रदुषण सायलेंट किलर म्हणून काम करतो. याचा परिणाम एक किंवा दोन वर्षात नाही तर अनेक दशकांनंतर दिसू शकतो. डब्ल्यूएचओने देखील हवा प्रदुषणाला जगभरात पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषीत केले आहे. जर सरकारला या गोष्टीची पुष्टी करायची असेल तर सरकारने या तरुणीच्या आजारावर कोणत्याही संशोधन संस्थेतून पडताळणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ऑक्टोबर २०१८ मधील केंद्रीय विज्ञान मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, दिल्लीत ४१ टक्के पीएम २.५ इतक्या तीव्रतेचे प्रदुषित कण वाहनांमधून बाहेर पडतात. २१.५ टक्के धूळ आणि १८ टक्के प्रदुषीत कण विविध कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवेत पसरतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button