breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

खासगी एजन्सीद्वारे सरकारी नोकरभरतीला रोहित पवार यांचा विरोध

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. खासगी एजन्सी नियुक्त करुन शासकीय नोकरभरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु हा निर्णय रोहित पवार यांना मान्य नाही.

तरुणांचा प्रतिनिधी म्हणून या निर्णयाला विरोध करणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. तसंच मेगाभरती एमपीएससीद्वारे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील रिक्त शासकीय पदांची संख्या दोन लाखापर्यंत गेली असताना, लवकरच विविध विभागातील पदांसाठीची मेगाभरती प्रक्रिया 20 एप्रिलपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी 15 एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त केली जाणार असून दोन दिवसात निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.

मात्र पुन्हा एकदा खाजगी एजन्सी नियुक्त करुनच ही भरती प्रक्रिया केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा विरोध समोर येणार आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट करुन एमपीएससीद्वारेच ही परीक्षा घेतली जावी, अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button