breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीचे गुन्हेगार कोण? आतापर्यंत ३८ मृत्यू ; ४८ गुन्हे नोंद

नवी दिल्ली | दिल्लीत गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती. जखमींपैकी आणखी ११ जणांचा मृत्यू झाल्याने दंगलीतील मृतांचा आकडा ३८ झाला. याप्रकरणी ४८ गुन्हे दाखल असून १३६ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेच्या दोन एसआयटी करतील. या दंगली सुनियोजित कटाचाच एक भाग असल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी केला होता. दंगलग्रस्त भागात अनेक ठिकाणी मोठ्या गुलेरसारखे पेट्रोल बॉम्ब लाँचर, पेट्रोल बॉम्ब, दगड-गोटे, अॅसिड पाऊच सापडल्याने सुनियोजित कटाच्या शंकेला बळ मिळते. मात्र, या कटातील सहभागाविषयी पोलिसांनी अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.

दरम्यान, प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या तीन भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधीची सुनावणी दिल्ली हायकोर्टाने चार आठवड्यांसाठी तहकूब केली. बुधवारी न्या. एस. मुरलीधर आणि तलवंतसिंग यांच्या पीठाने पोलिसांना गुरुवारपर्यंत गुन्हे दाखल करण्याविषयी निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. रात्री उशिरा न्या. मुरलीधर यांच्या बदलीची ऑर्डर आली. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल व न्या. सी. हरिशंकर यांच्या पीठाने ही सुनावणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button