breaking-newsक्रिडा

प्रो-कबड्डी: विजेता संघ बनणार करोडपती, जाणून घ्या बक्षीसाची रक्कम

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाने अखेरीस आपल्या उत्तरार्धात प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या मैदानावर यंदाच्या हंगामाचे प्ले-ऑफ आणि अंतिम सामना रंगणार आहे. सातव्या हंगामासाठी प्रो-कबड्डीच्या आयोजकांनी बक्षीसाच्या रकमेची घोषणा केली आहे. या हंगामासाठी एकूण ८ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम जिंकणाऱ्या संघाला ३ कोटी तर उप-विजेत्या संघाला १.८० कोटी रुपये मिळणार आहेत. याव्यतिरीक्त तिसऱ्या-चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील संघांनाही रोख रकमेचं बक्षीस मिळणार आहे. दबंग दिल्ली, बंगाल वॉरियर्स, यू मुम्बा, हरयाणा स्टिलर्स, बंगळुरु बुल्स आणि यूपी योद्धा या संघांनी प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.

अशी असेल बक्षीसाची रक्कम –

  • विजेता संघ – ३ कोटी
  • उप-विजेता संघ – १.८० कोटी
  • तिसरा क्रमांक – ९० लाख
  • चौथा क्रमांक – ९० लाख
  • पाचवा क्रमांक – ४५ लाख
  • सहावा क्रमांक – ४५ लाख
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button