breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

तामिळ अभिनेता विजयला प्राप्तिकर विभागाचा दणका, कोट्यावधींची रक्कम जप्त

तामिळ अभिनेता विजयच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. याचबरोबर दिग्दर्शक अंबू चेझियान यांच्या देखील घरासह विविध कार्यालयीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. एकूण ३८ ठिकाणी करण्यात आलेल्या या छापेमारीत तब्बल ६५ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता विजयची बुधवारी चौकशी देखील केली होती. त्याने कर चुकवेगिरी केल्याचा अधिकाऱ्यांना संशय होता. याचबरोबर एजीएस सिनेमा व दिग्दर्शक अंबू चेझियान हे देखील प्राप्तिकर विभागाच्या रडारावर होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button