breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

दहावीचा निकाल जाहीर : राज्याचा निकाल 89.41 टक्के, दहावीतही मुलींचीच बाजी…

  • दहावी व बारावी फेरपरिक्षा 17 जुलै पासून सुरू होणार

पुणे :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 0.67 टक्क्याने वाढ झाली असून 89.41 टक्‍के निकाल लागला असल्याची माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. दरवर्षी प्रमाणेच यंदाही राज्यात मुलींच पुढे आहेत. यंदा पुणे विभागाला निकाल 92.08 टक्‍के लागला आहे.  मुलींचा निकाल 91.97 टक्के तर मुलांचा 87.27 टक्के लागला आहे. राज्यातील सुमारे 17 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित शाळांमध्ये वितरीत केली जाणार आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत राज्याचा यंदा दहावीचा निकाल 0.67 टक्‍क्‍यांनी वाढला असून तो 89.41 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा 96 टक्के निकाल लागला असून कोकणने अव्वल स्थान पटकावले आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 इतका टक्‍का लागला आहे.

मुलांचा निकाल 87.27 टक्के तर मुलींचा निकाल 91.97 टक्के
राज्यातून एकूण 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी पास झाले आहेत

निकालाची विभागीय टक्केवारी…

1)  कोकण : 96 टक्के
2)  कोल्हापूर : 93.88 टक्के
3)  पुणे : 92.08 टक्के
4)  मुंबई : 90.41 टक्के
5)  औरंगाबाद :  88.81 टक्के
6)  नाशिक : 87.42 टक्के
7)  अमरावती : 86.49 टक्के
8)  लातूर : 86.30 टक्के
9)  नागपूर :  85.97 टक्के

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल 
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

मोबाइलवरही पाहता येणार निकाल
मोबाइल “एसएमएस’ सेवेद्वारेही निकाल पाहता येईल. BSNL मोबाइल क्रमांकावरून 57766 या क्रमांकावर MHSSC and send to short code 57766 अशा पद्धतीने मेसेज पाठवून निकाल जाणून घेता येणार आहे.

कला गुणांचा लाभ घेणारे विद्यार्थी

शास्त्रीय नृत्य 1437
शास्त्रीय गायन 1010
शास्त्रीय वादन 983
लोककला 1384
नाट्य 336
चित्रकला 1लाख 61 हजार 21
स्पोर्ट्स गुणांचा लाभ घेणारे 3849
90 पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी 63 हजार 331

दहावी व बारावी फेरपरिक्षा 17 जुलै पासून सुरू होणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button