breaking-newsपिंपरी / चिंचवड

कामगार नेते इरफान सय्यद यांनी संत तुकाराम महाराज पालखी रथाचे केले सारथ्य

– वारक-यांना 12 टन बुंदीच्या प्रसादाचे वाटप
पिंपरी, – जगद्गगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे निगडीत कामगार नेते इरफान सय्यद यांनी स्वागत केले. तसेच पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठी 450 टाळ आणि 12 टन बुंदीचे लाडू तयार करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, महिला संघटिका सुलभा उबाळे, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेता राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, ट्रांसपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमित धुमाळ, प्रमोद भावसार, अशोक काळे, दलवीर सिंघ, रोहतास चौधरी, महेंद्र गर्ग, राजेन्द्र मालू, बाळासाहेब शिंदे, भिवाजी वाटेकर आदी भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button