पिंपरी / चिंचवड

मतदार जनजागृती अभियानात दिव्यांग मतदारांचा शपथविधी

पिंपरी, महाईन्यूज

संत तुकाराम व्यापारी संकुल निगडी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहर व 205 चिंचवड विधानसभा मतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार जनजागृती अभियान व अपंगांचा शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकारी राधिका हावळ तसेच नोडल ऑफिसर संभाजी ऐवले, स्वप्निल भालेराव यांच्यासह प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे महिला शहराध्यक्ष संगिताताई जोशी रेवणनाथ कर्डिले ज्ञानदेव नारखेडे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना सहाय्यक निवडणूक अधिकारी राधिका हावळ म्हणाल्या की, निवडणुकीमध्ये अपंगांना कसे सहज मतदान करता येईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

संभाजी ऐवले म्हणाले की, चार मेळावे आयोजित करून दिव्यांग मतदान जनजागृती केली जाणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघबाबत दिव्यांगाना काही अडचण आल्यास निवडणूक अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

यावेळी सर्व अपंग बांधवांना मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली.

यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी मतदानादरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यथा मांडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button