breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘थलाइवी’चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना

मुंबई | तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘थलाइवी’चा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावत यामध्ये जयललिता यांची भूमिका साकारत आहे. कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने हा फर्स्ट लूक ट्विटरवर पोस्ट केला आहे. पुढील वर्षी 26 जून 2012 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1198172758204567552

जयललिता यांच्या रुपातील कंगना ओळखू येत नाही इतका वेगळा आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतल्याचे पाहयला मिळत आहे. या लूकसाठी तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट तामिळमध्ये ‘थलाइवी’ तर हिंदीत ‘जया’ नावानं प्रदर्शित होणार आहे. ‘एक सुपरस्टार हिरॉइन ते क्रांतीकारक हिरो…हे नाव तुम्हाला माहीत आहे…पण प्रवास मात्र नाही…’ असं म्हणत थलाइवी चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टर आणि व्हिडिओत कंगना जयललिता यांच्या आवडत्या हिरव्या रंगाच्या कांजीवरम साडीत दिसतेय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button