breaking-newsआंतरराष्टीय

महाभियोग चौकशीला काही अर्थ नाही – ट्रम्प

महाभियोगाच्या चौकशीतील सार्वजनिक सुनावणीच्या पाच दिवसांतील घडामोडीनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या चौकशीला अर्थ नसल्याचे सांगून प्रतिनिधिगृहापुढे साक्ष देणाऱ्या अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांना अपशब्द वापरले.

ट्रम्प यांनी प्रतिनिधिगृहातील काँग्रेस प्रतिनिधिगृहातील सुनावणी करणारे डेमोक्रॅट सदस्य हे मूर्ख असल्याची संभावना केली. आठवडाभरात याबाबत अफवा उठत आहेत असेही वक्तव्य त्यांनी केले. आता ट्रम्प यांना हकालपट्टी करण्यासाठीच्या महाभियोग ठरावावर  सिनेटमध्ये सुनावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षात आपल्याला मोठा पाठिंबा आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला असून त्यांनी फॉक्स अँड फ्रेंडसला दिलेल्या ५७ मिनिटांच्या  मुलाखतीत सांगितले की, आपल्याला महाभियोगाची अपेक्षा नव्हती पण आताच्या परिस्थितीत जर सभागृहाने त्यावर मतदान घेतले तर रिपब्लिकनांचे बहुमत असलेल्या सिनेटमध्ये त्याची सुनावणी होणार असल्याने त्याला आपली कुठलीच हरकत नाही. कारण त्या सुनावणीत अ‍ॅडम शिफ यांचे जाबजबाब घेण्याची संधी मिळणार आहे. सिनेट सुनावणीसाठी अजून सोपस्कार ठरवण्याचे काम चालू आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, पूर्व युरोपातील देशात चालू असलेला भ्रष्टाचारास प्रतिबंधाचा  हेतू युक्रेनची ४०० दशलक्ष डॉलर्सची मदत रोखण्यामागे होता. विरोधकांकडे ठोस असे काहीच नाही त्यामुळे महाभियोग मंजूर होणे अवघड आहे. खंडणी, लाचखोरी असे आरोप करण्यात आले आहेत ते  खोटे आहेत. जो बिदेन व हंटर बिदेन यांच्या चौकशीसाठी आपण युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचे आरोपही खोटे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button